नेवासा – शहरामधे प्रभाग निहाय बंदिस्त गटार स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे नेते मनोज पारखे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात म्हटले आहे की सध्या पावसाळा सुरू असल्याने शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे त्यामुळे या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे तसेच पावसाच्या पाण्यामुळे बरेचशा बंदिस्त गटारीमधुन सांडपाण्याचा निचरा होत नाही.
यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत व लहान मुलांसह अनेक नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सदृश्य आजाराची लागण झाली आहे शहरातील सर्व दवाखान्यांमधे नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे तरी नेवासकर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत आपण शहरातील सर्व प्रभागांमध्ये बंदिस्त गटारांची स्वच्छता करून डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी अन्यथा नगरपंचायत समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विलास बोरुडे, मनोज डहाळे, ऋषिकेश शहाणे, बाळासाहेब कदम, संतोष चांदणे, आदिनाथ पटारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.