ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

इंडियन ऑइल

गणेशवाडी – सोनई घोडेगाव रोडवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचा उत्तम एजन्सी नावाचा पेट्रोल पंप पासून या पेट्रोल पंपावर एक व दोन रुपयाची नाणी स्वीकारले जात नसल्याने नाईलाजाने कमी किंवा जास्त पेट्रोल टाकावे लागते पेट्रोल पंप चालकाच्या मनमानी पद्धतीने ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत असून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या तात्काळ या पंपावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकाकडून होत आहे आपल्या मनमानी पद्धतीने पंपचालक वागत असल्याने तो भारताचे एक व दोन रुपयाचे चलन मानत नाही त्यामुळे याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्राहकाच्या वतीने करण्यात येत आहे.

इंडियन ऑइल

या पेट्रोल पंपावर सुविधेचा अभाव दिसून येत आहे टॉयलेट ची सुविधा हवा चेक करण्याची सुविधा नाही कंपनी नियमाप्रमाणे या सर्व सुविधा पंपावर असायला हव्या मात्र या पंपावर असली कसली ही सुविधा दिसून येत नाही वरून पंप चालकाची दादागिरी त्याचबरोबर बाटलीमध्ये या पंपावर पेट्रोल डिझेल दिले जाते गाडी घेऊन आल्यानंतरच डिझेल व पेट्रोल दिले जाते एखाद्याला घरगुती कामासाठी डिझेल पेट्रोलची आवश्यकता असल्यास या पंपाहून पेट्रोल अथवा डिझेल विकत घ्यायचे असल्यास त्यांनी गाडी खरेदी करायचे का शेतीच्या कामासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी कुट्टी मशीनला डिझेलची आवश्यकता असते.

इंडियन ऑइल

मात्र या पंपाचालकाकडून गाडीतच डिझेल दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी कुट्टी मशीन या पंपावर घेऊन जायचे का असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे त्यामुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या पंपावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अकोळनेर डेपोवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे

इंडियन ऑइल
इंडियन ऑइल

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

इंडियन ऑइल
इंडियन ऑइल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

इंडियन ऑइल