ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बस

नेवासा – आगारातील विविध सुविधा व बसेस च्या अनियमितता ,बसेस वेळेवर सोडण्याबाबत तसेच आगाराला नवीन बसेस देणेबाबत. कार्यवाही करावी अशी मागणी नेवासा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील ताके यांनी विभाग नियंत्रक सौ.मनीषा सपकाळ यांचे कडे निवेदन देऊन केली आहे. विभाग नियंत्रक सौ. सपकाळ यांना दिलेल्या निवेदनात अनिल ताके यांनी म्हटले आहे की,नेवासा आगार हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ठिकाणी असलेला आगार आहे.त्यामुळे नेवासा आगार एक मॉडेल म्हणून पुढे यायला पाहिजे परंतु नेवासा आगारात अनेक सुविधांचा अभाव आहे,बस स्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नाही,अनेक जुन्या बसेस बंद झालेल्या आहेत.

अनेक गाड्या वेळेवर सुटत नाही,जवळ जवळ सर्वच बसेस नादुरुस्त व जुन्या झालेल्या आहेत,त्यामुळे या सर्वांचा परिणाम प्रवासी वाहतूक आणि प्रवासी संख्या घटण्यात होत आहे. नेवासा आगारमधून सुटणाऱ्या लांब पल्याच्या गाड्या रस्त्यावर मधेच कुठेही अचानक नादुरुस्त होऊन बंद पडण्याचे प्रकार अनेकदा घडतं आहेत त्यामुळे प्रवासी वेळेवर आपल्या महत्वाचे कामांसाठी, विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यासाठी जाऊ शकत नसल्याने प्रवासी वर्गात मोठया प्रमाणावर नाराजी आहे, त्यामुळेच अनेक प्रवासी हे नेवासा बस स्थानकातुन सुटणाऱ्या बसेसची वाट न बघता नेवासा फाट्यावर जाऊन इतर आगाराच्या बसेस किंवा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी प्रवास करणे पसंद करतात. या सर्व बाबींचा परिणाम नेवासा आगारातून सुटत असलेल्या बसेसवर होत आहे. असेही ताके यांनी स्पष्ट केले.

बस

या भागातील प्रवासी जनतेच्या भावना लक्षात घेऊन नेवासा आगारासह नेवासा बस स्थानकात पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच यापुढे नेवासा आगारातून सुटणाऱ्या सर्वच बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात, नादुरुस्त व जुन्या गाड्या बदलुन त्वरित किमान वीस नवीन बसेस नेवासा डेपोला देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावा.चालक- वाहक यांचेसह सर्वच कर्मचारी वेळेवर हजर राहिले पाहिजे अशा सूचना द्याव्यात अन्यथा या मागणीसाठी आम्ही राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार आहोत तसेच या सर्व मागण्यांसाठी आम्ही प्रवासी जनतेला घेऊन यापुढे कोणत्याही पूर्वसूचना ना देता आगारच्या काराभरावीरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशाराही अनिल ताके पा . यांनी पत्रकात दिलेला आहे.

newasa news online
बस
बस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बस
बस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बस