ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोपी

नेवासा – अल्पवयीन मुलीच्या विनयभंगा प्रकरणी आरोपी किरण संजय गायकवाड, वय २४ वर्षे, रा. खरवंडी, ता. नेवासा जि. अहमदनगर यास मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधिश श्री. हरीभाऊ आर. वाघमारे साहेब यांनी एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १४ हजार दंडावी शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विष्णुदास कस्तुरराव भोर्डे यांनी काम पाहीले.

पीडीत अल्पवयीन मुलगी ही शाळेमधुन तिव्या सायकलवर घरी जात असतानी आरोपी याने रस्त्यामध्ये नदीच्या पुलाजवळ सायकल आडवून तिचा हात धरून तिस म्हणाला की, तुझ्याशी मला बोलायचे आहे तेवढ्यात एक समोरून दुचाकीस्वार आला त्याला पाहून आरोपी पळून गेला.

या घटणेबाबत पिडीताच्या आईने शनि-शिंगणापूर पोलीस स्टेशन ता.नेवासा जि. अहमदनगर येथे गु.र.क्र. १०२ / २०२२ भा.द.वि. कलम ३४१, ३५४, ३५४-४, ५०६, ३४ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.सदर गुन्हयाचा तपास श्री. आर. टी. कर्पे यांनी करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले. सदर खटल्यात चौकशीकामी एकूण सात साक्षीदार सरकारपक्षातर्फे तपासण्यात आले. त्यापैकी पिडीता व पिडीताची आई तसेच, तपासी अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.

आरोपी

तसेच, सरकारी वकीलांनी केलेला प्रभावी युक्तिवाद मा. न्यायालयाने विचारात घेऊन भा.द.वि. कलम ३५४ अन्वये दोषी धरून त्यास एक वर्षे तुरुंगवास व दंड रूपये ७,०००/- अशी शिक्षा दिली. तसेच, भा.द.वि. कलम ३५४-४अन्वये आरोपी किरण यास दोषी धरून त्यास एक वर्षे तुरूंगवासाची शिक्षा व रुपये ७,०००/- दंड व दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिणे तुरूंगवास भोगावा तसेच, दंडाच्या रकमे पैकी रक्कम रुपये १०,०००/- अपीलाची मुदत संपल्यानंतर पिडीतास देण्यात यावी असा निकाल मा. न्यायालयाने दिला. सदरच्या खटल्यात सरकारपक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विष्णुदास कस्तुरराव भोई यांनी काम पाहिले, पैरवी अधिकारी म.पो.कॉ. ज्योती नवगिरे, पो. कॉ. सुभाष हजारे, सहा. फौजदार एन. एल. चव्हाण, पो. कॉ. मुकुंद पोटफोडे यांचे सहकार्य लाभले.

newasa news online
आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी