नेवासा – श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने कार्यक्षेत्रातील पुरुष व शेतकरी महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच प्रात्याक्षिके राबविले जातात. या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बोध घेऊन तंत्रज्ञान आत्मसात करावे हा मुख्य उद्देश कृषि विज्ञान केंद्राचा आहे. टी.एस.पी. प्रकल्पांतर्गत मागासवर्गीय लाभार्थ्यांना प्रात्यक्षिक निविष्ठा वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील उपस्थित होत्या.
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे प्रक्षेत्रावर फवारणी प्रात्यक्षिक व परसबागेतील पोषणबागेच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित महिला लाभार्थांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना.सौ.राजश्रीताई घुले यांनी मार्गदर्शन करताना परसबागेतील पोषणबाग उत्तम आरोग्यासाठी महत्वाची असल्याचे पटवून दिले.
फवारणी करत असतांना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी केव्हीके चे शास्त्रज्ञ माणिक लाखे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी टी.एस.पी.प्रकल्पांतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना फवारणी निविष्ठा व महिला शेतकऱ्यांना परसबागेतील पोषणबागेसाठी भाजीपाला बियाणे कीट प्रात्यक्षिकासाठी मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच केव्हीके दहीगाव-ने च्या माध्यमातून नैसर्गिक शेती या विषयावर प्रशिक्षण घेतलेल्या कृषि सखींना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उमेद अभियानाचे दहीगाव-ने प्रभाग समन्वयक दिनेश काशिद, समाज विकास समिती नेवासा च्या सिस्टर रिटा, प्रगतशील शेतकरी रुस्तुम नवले, विलास लोखंडे, केव्हीके चे शास्त्रज्ञ श्री नारायण निबे, श्री.नंदकिशोर दहातोंडे, डॉ.चंद्रशेखर गवळी, श्री.प्रकाश हिंगे व श्री. प्रकाश बहिरट इ. मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन इंजी.राहुल पाटील व आभार श्री.सचिन बडधे यांनी मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.