नेवासा –अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील त्रिमूर्ती शैक्षणिक संकूल,तेलकूडगाव येथे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक साहेबरावजी घाडगे पाटील यांचा ७०वा अभिष्टचिंतन सोहळा व पालक भेट दिन दिनांक २०जुलै २०२४रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त दादासाहेब घाडगे पाटील होते तर संस्थेच्या अध्यक्षा सौ.ॲड.सुमतीताई घाडगे पाटील,सचिव मनिष घाडगे पाटील, विश्वस्त आण्णासाहेब घाडगे पाटील,प्रशासक मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना संस्थेच्या अध्यक्षा ॲड.सौ.सुमतीताई घाडगेपाटील म्हणाल्या की माणूस शिक्षणाने,ज्ञानाने आणि कर्माने मोठा होत असतो.
आपल्या मनोगतातून साहेबराव घाडगे पाटलांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान च्या यशस्वी घोडदौडीचा इतिहास सांगत राज्यभरात त्रिमूर्ती च्या विविध शाखांमधून आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम सक्षमपणे केले जात आहे,पालकांनी ही आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार मानले.यावेळी तेलकूडगावच्या त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या बालसैनिकांनी संस्थापक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फटाक्यांच्या आतषबाजीसह उत्कृष्ट नृत्य सादर करत शुभेच्छा देत उपस्थितांची मने जिंकली.
वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयात क्रीडा सप्ताहाचे आयोजन तसेच ७०झाडांचे-वृक्षारोपण ही करण्यात आले होते. याप्रसंगी तेलकूडगाव सेवा सोसायटी चे आजी-माजी चेअरमन,संचालक, तेलकूडगाव ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे पालक-ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासक मनिषा राऊत यांनी केले तर संचालन श्रीम.रेखा राणे व रेणुका काळे यांनी केले आभार प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांनी मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.