ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बालविवाह

नेवासा – बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण आजच्या काळात हे असे कृत्य घडणे म्हणजेच मागासलेपणाचे लक्षण आहे. मुलींचे १८ वर्षाची आतील तर मुलाचे २१ वर्षाच्या आतील मुलाचे लग्न लावले असेल तर मुली व मुलाचे आई, वडील, नातेवाईक, लग्न जमविणारे, लग्न लावणारे, यासह लग्नात उपस्थित राहून मदत करणारे अशा सर्वांवर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे बालविवाह कराल, तर तुरूंगात जाल, असा इशारा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला.

कै.सौ. बदामबाई धनराजशेठ गांधी विद्या मंदिर आणि ज्ञानोदय कन्या विद्यालयामधील ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि सामजिक संस्था यांच्या माध्यमातून स्नेहालय उडान प्रकल्प, नगर यांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक पदयात्रा नेवासा शहरात काढण्यात आली. नगर जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याचे ध्येय समोर ठेवून स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, नगर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक जनजागृती आणि पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. या पदयात्रेत विद्यार्थी व विद्यार्थिनी बालविवाह प्रतिबंधक घोषणाबाजी देत बालविवाह रोखण्यासाठी निर्धार केला.

बालविवाह

उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी प्रस्तावना केली. सूत्रसंचालन पूजा झिने यांनी तर आभार कदम यांनी मानले. पदयात्रा यशस्वी करण्याकरीता ज्ञानोदय स्कूलचे ढेरे, संजय चौधरी, शिक्षक, सत्यमेव जयते प्रतिष्ठानचे अॅड. जैद शेख नेवासकर, ज्ञानेश्वर मंदिर व्यवस्थापक भैया कावरे, महेश मापारी, शाहीद शेख, स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले.

newasa news online
बालविवाह
बालविवाह

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बालविवाह
बालविवाह

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बालविवाह
error: Content is protected !!