ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ग्रामपंचायत

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ!

नेवासा फाटा – मुकिंदपूर (ता.नेवासा) येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन सुमारे चार महीण्यांपासून रखडल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर काम करुनही उपासमारीची वेळ ओढावलेली असून थकीत ऑनलाईन वेतनाबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नेवासा पंचायत समितीच्या समन्वयकांची वेळोवेळी भेट घेवूनही ऑनलाईन वेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उसणवारी करुन उदरनिर्वाह करण्याची वेळ आल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेवून मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

याबाबत मुकिंदपूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत मांडतांना प्रस्तृत प्रतिनिधी’शी बोलतांना सांगितले की, जिल्हातील कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन वेळेवर होत असतांना केवळ नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन वेतन वेळेवर होत नसल्यामुळे आम्ही वेळोवेळी नेवासा पंचायत समितीचे समन्वयकांशी चर्चा केली,गटविकास अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला माञ दखल घेतली गेली नाही त्यामुळे आमच्या कुटूंबियांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली असून पुन्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नेवासा पंचायत समितीचे समन्वयकांशी संपर्क साधला मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या लॉगींवर वेतन थांबले असल्याची माहीती यावेळी बोलतांनी कर्मचाऱ्यांनी दिलेली असून जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत असतांना केवळ नेवासा तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची फडफजिती का? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थिती करुन सुमारे चार महिण्यांपासून अडकलेले कर्मचाऱ्यांचे वेतन मिळण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ग्रामपंचायत
ग्रामपंचायत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ग्रामपंचायत