ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

श्रीरामलीला

नेवासा – श्रीरामराज्य उत्सव समिती नेवासा तालुका यांच्या वतीने नेवासा येथील बाजारतळ प्रांगणात सनातन धर्म प्रचारक श्रीरामलीला उत्सव सुरू झाला असून अकरा दिवस चालणाऱ्या रामलीला उत्सवाचा नेवासा शहरातील श्रीरामभक्तांनी  लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम राज्य उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
    श्रीरामलीला उत्सवाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची आरती गाऊन व श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी रामलीला  उत्सव सोहळयाचे प्रमुख महंत पंडित हरीचंद्र उपाध्यक्ष महाराज यांचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.रामभक्त संतोष पडूंरे यांनी आलेल्या श्रीराम भक्तांचे स्वागत केले

श्रीरामलीला

 श्री सत्य सनातन धर्म रामायण रामलीला मंडळ विंध्याचल धाम काशी उत्तरप्रदेश येथील रामलीला कलाकार असून यावेळी झालेल्या कार्यक्रम उपाध्यक्ष मुकेशकुमार सिंह,व्यवस्थापक राधिका प्रसाद प्रजापती, व्यासपीठ श्रीकृष्णकुमार मिश्रा,अवधेशकुमार शुक्ला, श्री पंकज ओझा,शिवसहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष बालेंद्र पोतदार, नेवासा येथील संयोजन समितीचे संतोष पडूंरे, कुमार गरुटे,पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे गणेश फाटक,अभय वाघ यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अकरा दिवस चालणाऱ्या या श्रीराम लीला महोत्सवात श्री मुनी आगमन ताडका वध,मारीच सुबाहू वध,अहिल्या उद्धार नगर दर्शन,धुष यज्ञ रावण-वाणसूर विदेह राजक विलाप,लक्ष्मण क्रोध,धनूय भंग,श्री परशुराम लक्ष्मण संवाद,सीता विवाह,कैकयी मंथरा संवाद,दशरथ संवाद, राम वन गमन,सीता हरण,शबरी भेट,श्रीराम हनुमान भेट,सुग्रीव मित्रता,बाली वध,लक्ष्मण शक्ती,राम विलाप, कुंभकर्ण व मेघनाथ वध,रावण वध,रामराज्याभिषेक असे प्रसंग अभिनयाद्वारे रामलीला महोत्सवात दाखविण्यात येणार आहे.प्रभू रामचंद्र भगवंताबद्दल असलेली श्रद्धा अधिक बळकट करण्यासाठी या सोहळ्याला तन,मन धनाने सहकार्य करा व रामलीला पहाण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन रामलीला महोत्सवाचे प्रमुख महंत पंडित हरीचंद्र उपाध्यक्ष महाराज व श्रीरामराज्य उत्सव समितीच्या करण्यात आले आहे.

श्रीरामलीला
श्रीरामलीला
श्रीरामलीला

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीरामलीला
श्रीरामलीला

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीरामलीला
error: Content is protected !!