ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

संभाजीनगर

नेवासा – आषाढी एकादशीच्या निमित्ताने २६ वर्ष विधाते बंधू आपला अभंगवाणी हा कार्यक्रम सादर करत असतात. यावर्षीचे अभंगवाणीचे २७ वे वर्षे होते.संभाजीनगर येथे पार पडलेल्या विधाते बंधूंच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीचे पूजन करण्यात आले.रसिक श्रोत्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात विधाते बंधूंनी अभंगवाणी सादर केली. प्रारंभी दीपप्रज्वलन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे.पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे.सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे.माजी महापौर नंदकुमार घोडिले. जिल्हा दूध संघाचे संचालक डी के पाटील.छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग समूहाचे अध्यक्ष दामू अण्णा नवपुते. आनंद तांदुळवाडीकर. रखमाजी जाधव. किशोर गारुळे या मान्यवरांच्या हस्ते झाले.

विधाते बंधूंचा सत्कार आलेल्या सर्व मान्यवरांनी केला.अत्यंत धीर गंभीर आवाज.शास्त्रीय संगीताची पक्की बैठक. उत्कृष्ट साथीदार कलावंत.मनाला वेधून घेणारे स्टेजवरील आकर्षक अशी प्रकाश योजना.व्यासपीठावरील आकर्षक देखावा.या कार्यक्रमाच्या जमेच्या बाजू होत्या.  कार्यक्रमांमध्ये साथ संगत करणारे कलावंत निरंजन भालेराव (बासरी) सुरेश विधाते (व्हायोलिन) योगेश सुकनाळे( हार्मोनियम) कृष्णकुमार विधाते.सागर काटे( तबला) अक्षय पवार हरी चव्हाण(मंजिरी) अभंगवाणी कार्यक्रमात बजरंग विधाते यांनी वेगवेगळ्या संत परंपरेचे दाखले देत निवेदनाची बाजू भक्कमपणे सांभाळली.महाराष्ट्रातील मान्यवर संत रचनाआधुनिक भक्ती गीतांचा समावेश अभंगवाणी कार्यक्रमात होता.प्रारंभी गणेश वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

संभाजीनगर

त्यानंतर अवघे गरजे पंढरपुर.पंढरी निवासा सखा पांडुरंग. इंद्रायणी काठी.अभिर गुलाल  उधळीत रंग. विठ्ठला तू वेडा कुंभार या व अशा अनेक स्वतः स्वरबद्ध केलेल्या व लोकप्रिय रचना गाऊन विधाते बंधूंनी सादर केल्या.या कार्यक्रमात पालकमंत्री संदिपान भुमरे माझी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार भागवत कराड विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे. माजी महापौर बापू घडामोडी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राधाकिसन पठाडे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ. गॅलेक्सी इंडस्ट्रीचे रत्नकर देशमुख. इंगळे पाटील. राजगुडे. मोहनराव आहेर. शामराव किवळेकर .मनोज चोपडा. डॉक्टर शिवाजी माळी. डॉक्टर सातारकर. एडवोकेट प्रसाद जरारे आदींसह मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.

संभाजीनगर
संभाजीनगर
संभाजीनगर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संभाजीनगर
संभाजीनगर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संभाजीनगर
error: Content is protected !!