ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

हल्ला

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील अमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणातून युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करत एक जखमी झाल्याची घटना घडली आहे . पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार फिर्यादी पांडुरंग दत्तात्रय पवार वय २४ रा. वाटापुर हे दि. १८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वाटापुर ते करजगाव रोडवर मोरे वस्ती अमळनेर येथुन जनावरांचे औषधे आणण्यासाठी जात असताना त्याठिकाणी एक विना नंबरची दुचाकी व चार चाकी वाहनातून आलेले शरद निव्रुत्ती चोपडे, बंटी औटी दोघे रा. वाटापुर, पका थोरात व एक अनोळखी दोघे राहणार तमनर आखाडा ता. राहुरी यांनी फिर्यादी यास धक्का देत खाली पाडत शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली

व सोबत आणलेल्या लोखंडी पाइप ,तलवारीने फिर्यादी यास मारहाण करत जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. दि.२० जुलै रोजी दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र नं. ३१०/२०२४ बिएनएस ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२)(३) ३२४(४)(५), आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोना. बि. एम. तागड हे करत आहेत.

हल्ला
हल्ला
हल्ला

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हल्ला
हल्ला

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हल्ला