ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

विभाग

तक्रारींचा निपटारा करण्याच्या विभाग नियत्रंक मनीषा सपकाळ यांच्या सूचना…

नेवासा : राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन या उपक्रमाला नेवासा येथे चांगला प्रतिसाद मिळाला.विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी उपस्थित राहून प्रवाश्यांच्या तक्रारी ऐकल्या. प्रवाशांच्या प्राप्त तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना सपकाळ यांनी दिल्या. १९ जुलै रोजी नेवासा आगारात विविध तक्रारींचे निवेदने विभाग नियंत्रकांना देण्यात आली.यावेळी भाजपाचे मनोज पारखे,ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विलास बोरुडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे, निलेश शेंडे, महेश आरले, गणेश गायके, राजेश कडु यांनी निवेदन देत बसस्थानकामधे रात्री ९ नंतर वाहतूक नियंत्रक राहत नाही,सुरक्षारक्षक नसल्याने अनेकदा चोरीच्या घटना घडत आहे.

वेगवेगळ्या कारणांनी शिर्डी संभाजीनगर या बसेस बऱ्याच वेळ आगारामधेच थांबत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत तसेच बसस्थानकामधे परिसरामध्ये अस्वच्छता आहे,बहुतांश बसेस जुनाट असल्याने प्रवास करताना बंद पडणे, टायर फुटने अशा घटना घडत आहेत त्यामुळे नेवासा आगाराला नविन बसेस पुरवण्यात याव्यात अशी मागणी केली. त्याच प्रमाणे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके यांनी ही प्रवाशांसाठी पाणपोई सुरू करणे,चौकशी कक्षाचा फोन सुरू ठेवावा,बस गाड्या वेळेवर स्थानकावरून सोडाव्यात,नवीन गाड्या मिळाव्यात या मागण्यांचे निवेदन दिले.

विभाग

तसेच प्रवाश्यांच्या सोयीसाठी संभाजीनगर – पुणे तसेच पुणे -संभाजीनगर बसेस नेवासा बस स्थानकामार्गे वळवाव्यात अशी मागणी प्रेस क्लबचे सचिव पत्रकार सुहास पठाडे व पत्रकार पवन गरुड यांनी केली. आम् आदमी पार्टीचे ॲड सादिक शिलेदार व संदीप अलवने यांनी नवीन बसेस ची मागणी करत विविध समस्यांवर चर्चा केली. या सर्व तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना विभाग नियंत्रक सपकाळ यांनी दिल्या. यावेळी आगार व्यवस्थापक रामनाथ मगर,सहायक कार्यशाळा अधीक्षक प्रशांत होले,राकेश सोनवणे यांच्यासह कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.

newasa news online
विभाग
विभाग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विभाग
विभाग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विभाग
error: Content is protected !!