नेवासा – मुंबईच्या क्रिकेट पंढरीत संत ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमी असलेल्या नेवाशाचा भूमिपुत्र सुमित राजेंद्र मारकळी हा चमकला असून नेवासा तालुक्यातून प्रथमच महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्राच्या रणजी कॅम्पसाठी निवड झालेला क्रिकेट खेळाडू ठरला आहे. नेवासे बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र मारकळी यांचा मुलगा सुमित याला बारा वर्षांच्या अथक कष्ट व केलेल्या श्रमाचे फळ मिळाले असून त्याची रणजी ट्रॉफी महाराष्ट्र कॅम्प निवड झालेली बातमी ऐकताच नेवासातील सर्वच मान्यवरांनी व नागरिकांनी राजेंद्र यांची भेट घेऊन अभिनंदन केले. मित्रांनी शहरात अभिनंदनाचे मोठे फलक लावले.
जिल्हा परिषद शाळा नेवासे बुद्रुक नंतर ज्ञानोदय इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुमित हा हायस्कूलपासूनच क्रिकेटमध्ये स्थानिक पातळीवर चमकत होता. त्याला शाळेतील त्याचे क्रीडाशिक्षक सुधीर बोरकर व नेवासे शहरातील क्रिकेट अकॅडमी चालवणारे किरण शिंदे यांनी क्रिकेटचे प्राथमिक धडे दिले. त्यानंतर सुमितने श्रीरामपूर येथील महेश बोरावके यांच्या साई क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. चार वर्ष नेवासे श्रीरामपूर अपडाऊन करीत रोज सकाळी पाच ते दहा व दुपारी शाळा संपल्यानंतर पुन्हा दोन तास असा सराव त्यांनी करून घेतला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे त्याने पुणे येथील अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला व त्यानंतर शिवाजी पार्क जिमखाना मुंबई क्रिकेटच्या पंढरीमध्ये त्याने आपले पाऊल टाकले. या ठिकाणी पाच वर्ष राजेश सनील सरांकडे प्रशिक्षण घेतले.
या बारा वर्षांच्या कष्टामध्ये त्याने सुरुवातीला अष्टपैलूत्वाची चमक दाखवली. परंतु मार्गदर्शकाच्या सल्ल्याने तो आता मध्यम गती गोलंदाज म्हणून विविध संघांमध्ये आपली कामगिरी बजावत आहे. शिवाजी पार्क जिमखाना ए डिव्हीजन क्रिकेटमध्ये एक वर्षात २०२३ मध्ये सर्वात जास्त ८१ बळी त्याने मिळवले, नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये खेळताना एक डावात त्याने १३ बळी मिळवले. त्याला आयपीएलच्या राजस्थान रॉयल टीमने देशातील ठरावीक गोलंदाजामधून स्वतंत्र नेट बॉलर म्हणून निवड करून त्याला विशेष व प्रशिक्षण दिले. २०२४ मध्ये मुंबई ऐवजी महाराष्ट्र संघाच्या माध्यमातून व खेळण्याचे त्यांनी ठरवले व पुण्यात आपला मुक्काम हलवला दरम्यान महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये त्याने कोल्हापूर संघाकडून खेळताना विक्रमी खेळी केली होती पुण्यात आठ कसोटीमध्ये ५६ विकेट घेण्याचा विक्रम त्याने केला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.