खेडले परमानंद – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी जून महिन्यात केवायसी करण्यासाठी रेशन धान्य दुकानदार घरोघरी फिरू लागला.लोकांनी केवायसी म्हणून थम दिले मात्र प्रकार वेगळाच घडत होता. संबंधित धान्य दुकानदाराने लोकांचे थम घेऊन जून महिन्यातील वाटप झाल्याचे पुरवठा विभागाला दाखवले. मात्र प्रत्यक्षात जून महिन्यातील रेशन वाटप झालेच नाही.
याबाबत धान्य दुकानदाराला विचारणा केली असता अप्पर नायब तहसीलदार सानप यांनी रेशन दुकानाला सील ठोकल्यामुळे रेशन वाटप करता आले नाही अशी बतावणी केली. हा सर्व प्रकार काही का असेना परंतु या गोष्टीमुळे खेडले परमानंद तालुका नेवासा येथील रेशनचे लाभधारक गरीब नागरिक मात्र वंचित राहिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीची चौकशी करून जबाबदार असलेले अधिकारी व राशन धान्य दुकानदार यांची चौकशी करून नागरिकांना त्यांचे राशन उपलब्ध करून द्याव अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.