ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरोपी

खेडले परमानंद – नेवासा तालुक्यातील येथील शेतकरी संभाजी भानुदास शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती . याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार दिनांक 15 रोजी खेडले परमानंद गट नंबर 302 मधील इलेक्ट्रिक मोटार स्टार्टर, ऑटो व पाच बाय सहा चा लोखंडी कॉट असा माल फिर्यादीचा चोरीला गेलेला होता फिर्याद दाखल झाल्यापासून सहाय्यक फौजदार दहिफळे या प्रकरणाचा तपास करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा मुद्देमाल हा राहुरी तालुका हद्दीतील प्रिपी वळण येथील शिवाजी शिंदे यांच्या वस्तीवर राहणदार असलेल्या इसमाच्या घरी आहे आत्ता गेल्यास मिळून येईल पोलिसांना सदरची माहिती समजताच दिनांक 22 रोजी सकाळी सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मेढे तपासी अधिकारी दहिफळे ,जावळे ,मोरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले.


यांची नावे पुढीलप्रमाणे आकाश गोरख पवार , शरद बाळासाहेब सूर्यवंशी सदर आरोपींना मुद्देमाला सह सोनई पोलीस ठाण्यात हजर केले फिर्यादी यांचा फक्त लोखंडी कॉट मिळून आला परंतु इलेक्ट्रिक स्टार्टर व ऑटो मिळाला नाही . खेडले परमानंद शिवारात फिर्यादी संभाजी शिंदे यांच्या शेजारी इतर लोकांच्या वस्तू असताना त्या चोरी गेल्या नाही मात्र शिंदे यांच्या वस्तूच का चोरी गेल्या व त्या चोरी करण्यास संबंधित आरोपींना कोणी भाग पाडले हा प्रश्न आता उपस्थित होत आहे? या सर्व गोष्टी घडून आणणारा सूत्रधार कोण ? या गोष्टीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. याप्रकरणी अधिक तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी सहाय्यक फौजदार दहिफळे हे करीत आहेत.

आरोपी
आरोपी
आरोपी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी
error: Content is protected !!