ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बांधकाम मजुर

नेवासा – बांधकाम मजुरांना 90 दिवसाचा दाखला ग्रामसेवकाकडून मिळावा यासाठी पंचायत समितीमध्ये कामगार विभाग व कामगार संघटना यांची समन्वय बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी सरकारी कामगार अधिकारी तु.ग. बोरसे शॉप इन्स्पेक्टर दाभाडे व केदार हे उपस्थित होते बिडिओ संजय लखवाल व कासार साहेब यांच्यासमवेत समर्पण मजदूर संघाच्या वतीने डॉ. करणसिंह घुले, ॲड. बन्सी सातपुते यांनी चर्चेत सहभाग घेतला.

बनावट बांधकाम मजुरांचा प्रश्न नेवासा तालुक्यात गंभीर बनला असून त्याबाबत कठोर उपाय योजना करून फौजदारी कारवाई करणे गरजेचे आहे याबाबत सर्वांचे एकमत होते. परंतु बनावट कामगारांच्या आडून खऱ्या कामगारांना लाभापासून वंचित ठेवणे योग्य नसल्यामुळे जे कामगार पूर्वी नोंदणीत आहेत अशा बांधकाम कामगारांना स्थानिक चौकशीच्या आधारे नूतनीकरणासाठी दाखले देण्यात यावेत अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. बनावट कामगारांचा प्रश्न निकाली लागेपर्यंत नवीन कामगार नोंदणी प्रशासनाने स्थगित ठेवली तरी चालेल असेल म्हणणे यावेळी मांडण्यात आले.

बांधकाम मजुर

बांधकाम मजुरांना दाखले न मिळाल्यामुळे शिष्यवृत्तीची, घरकुल योजना, विमा व इतर अर्थसहाय्य मिळवण्यामध्ये मोठी अडचण होत असल्याने आजच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार अंमलबजावणी झाली नाही तर खेडोपाडी बांधकाम कामगार आक्रमक होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.

newasa news online
बांधकाम मजुर
बांधकाम मजुर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बांधकाम मजुर
बांधकाम मजुर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बांधकाम मजुर
error: Content is protected !!