नेवासा – तालुक्यातील बहिरवाडी व नेवासा शिवारात अनेक दिवसापासुन शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत होते. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केल्याच्या अनुशंघाने वनविभागाकडुन पिंजरा लावण्यात आला होता.
मंगवार दि. २२ जुलै रोजी वनविभागाकडुन पिंजरा लावण्यानंतर दुसर्या दिवशी सायंकाळच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे शेतकऱ्यांनी बघीतल्यानंतर वनविभागाला कळविले. त्यानंतर सकाळी वनअधीकारी घटनास्थळी दाखल झाले. पाऊस सुरु असल्या कारणाने पिंजरा टँक्टरच्या सहाय्याने वन कार्यालयात घेवुन गेले.
सदरच्या बिबट्याने शेतकर्यांमधे बऱ्याच दिवसापासुन भितीचे वातावरण होते. बिबट्याने अनेक ठिकाणी शेळ्या फस्त केल्या होत्या. शेतकऱ्यांना शेतीचे कामे जीव मुठीत धरुन करावे लागत होते. बिबट्या पकडल्यामुळे शेतकर्यांनी सुटकेचा श्वास सोडला असुन वनविभागाचे आभार मानले. पकडलेला बिबट्या वरिष्टांच्या आदेशाने सुरक्षीत स्थळी मुक्त करण्यात येणार असल्याचे वनरक्षक शिसोदे यांनी सांगीतले. सदरची कामगिरी वनपाल डिके, पातारे, वनरक्षक शिसोदे, कानडे, कर्मचारी मोरे, गाढे, घोरपडे यांनी केली. बिबट्या पकडण्याच्या कामगिरीत परीसरातील शेतकर्यांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे वनविभागाकडुन सांगण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.