सोनई – लटकु मुळे गेल्या अनेक वर्षापासून कित्येक अपघातात अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे. पोलीस प्रशासनाने देखील या लटकू पुढे हात टेकले आहेत. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयापासून सदरचे लटकू भाविकांचा पाठलाग करत असतात त्यामुळे महाविद्यालय परिसरातील त्याचप्रमाणे शनिश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व सर्व सामान्य नागरिकांच्या जीवावर टांगती तलवार दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी एका कमिशन एजंटने तर हद्दच पार केली एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर हल्ला करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला व कोयतेने एका भाविकाच्या वाहनाचे नुकसान देखील केले सुदैवाने ग्रामस्थांनी धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या कमिशन एजंट मुळे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी अनेक दिवसापासून लुटले जात आहे व याचमुळे आज अब्जाधीश झालेले कमिशन एजंट आज दादागिरीवर उतरल्याचे दिसून येते परंतु या घटनेमुळे शनिशिंगणापूर ग्रामस्थ मात्र आक्रमक झाले व त्यांनी काल दिवसभर शिंगणापूर कडकडीत बंद ठेवले. शनिशिंगणापूर देवस्थानच्या या साडेसातीचा बंदोबस्त होणार का असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलीस प्रशासन व देवस्थान काय ठोस भूमिका घेणार याकडे आता भाविकांचे त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.