ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

लटकु

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील पथकर नाक्यावर लटकुने केलेल्या हल्ल्यात तेथे कार्यरत असणारा कर्मचारी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २३ जुलै रोजी शिंगणापूर येथील पथकर नाक्यावर फिर्यादी सोमनाथ अशोक बानकर रा. शनिशिंगणापूर हे नेहमी प्रमाणे आपली ड्युटी बजावत असताना त्या ठिकाणी अविनाश दादाहरी सावंत, सागर भिमराव शिंदे दोघे रा. मुळा कारखाना हे तेथील पथकर नाक्यावर आले फिर्यादीच्या व ग्रामपंचायत च्या नावाने मोठ मोठ्याने शिवीगाळ करु लागले. सागर शिंदे य याच्या हातात धारदार कत्ती होती. तेव्हा फिर्यादी हे घाबरून त्या ठिकाणी देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीत जाऊन बसले.

तेव्हा सागर शिंदे याने त्या गाडीवर हल्ला करत गाडीचे नुकसान केले. तेव्हा फिर्यादी बसलेल्या गाडीच्या दुसऱ्या दरवाजातून पळून गेला. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतरही कर्मचारी यांना शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दाखल फिर्यादी वरुन अविनाश दादाहरी सावंत व सागर भिमराव शिंदे यांचे विरुद्ध गुन्हा र नं. १७९/२०२४ बिएनएस चे ३२४(४), ११५(२), ३५२,३५१(२) (३), आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. फौजदार नितीन सप्तर्षी हे करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी लागलीच घटनेतील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पो. हे. काॅ. गुलाब मोकाटे, पो. हे. काॅ. आदेश घोडके, पो. काॅ. अजय ठुबे यांच्या पथकाला पाठवुन आरोपी ताब्यात घेतले.

लटकु
लटकु
लटकु

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लटकु
लटकु

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लटकु
error: Content is protected !!