गणेशवाडी – सोनई जवळील वंजारवाडी येथे झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. दि. २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फिर्यादी शोभा बाबासाहेब कुऱ्हे वय ५० व त्यांचा भाऊ बाबासाहेब रामभाऊ भोगे दोघे रा. खरवंडी ता. नेवासा हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच १७ बि ई ६५२५ या गाडीवर ब्राम्हणी वरुन सोनई कडे येत असताना वंजारवाडी गावच्या कमानी जवळ एम एच १६ डिई ७६२९ या क्रमांकाची गाडी ने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत फिर्यादी यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली व आपली दुचाकी त्याच ठिकाणी सोडून पळून गेला असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. फिर्यादी वरुन गुन्हा र नं व कलम ३१५/२०२४ बिएनएस २८१,१२५(अ), १२५(ब), ३२४(४)(५), मोवा. का. कलम १८४/१७७, १३४(अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा फौ. के. बि. राख हे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.