ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

माती परीक्षण

नेवासा – महात्मा फुले कृषी विद्यापीठास संलग्न असलेल्या कृषि महाविद्यालय, सोनई यांच्यावतीने दि २६ जुलै रोजी नेवासा तालुक्यातील बाभुळखेडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील औताडे, सोसायटीचे चेअरमन नारायण कडू , गावचे पोलीस पाटील प्रल्हाद विधाटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, तसेच प्रगतशील शेतकरी सुर्यभान नवले व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच कृषी महाविद्यालय सोनईचे उपप्राचार्य बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ.अतुल दरंदले, प्रा. श्रीकृष्ण हुरुळे सर (वनस्पती रोग शास्त्र विभाग) मान्यवर उपस्थित होते.

माती परीक्षण

तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. जयसिंग वाघमारे, प्रा. राहुल गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अंतर्गत झालेल्या प्रथम तांत्रिक सत्रात कृषि महाविद्यालय सोनई येथील प्रा. सुनील बोरुडे यांनी महाविद्यालयामध्ये चालत असलेल्या विविध प्रकल्पांची जसे माती परीक्षण साठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा, जिवाणू खते प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, रोपवाटिका, यांची माहिती दिली व महाविद्यालयात भेट देण्याच्या आवाहन केले. प्रा. श्रीकृष्ण हुरळे यांनी माती परीक्षण, तसेच मका किड नियंत्रण व कांदा पिकाचे व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यानंतर कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले सरांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन कृषि महाविद्यालय सोनईचे कृषिदुत, प्रशांत जोरी, दिपक लोखंडे, चैतन्य होन, अभिजीत गवते, अभिषेक आदमाने यांनी केले होते.शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनपर चर्चासत्रास मोठ्या संख्येने उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या वेळी देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

माती परीक्षण
माती परीक्षण
माती परीक्षण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

माती परीक्षण
माती परीक्षण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

माती परीक्षण