ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा – अतिक्रमण काढण्यास विरोध करत पोलिसांशी झटापट करत गळफास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विरुद्ध नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की ६ ऑगस्ट रोजी बहिरवाडी शिवारातील गट नंबर १३ व १४ मध्ये कंपाऊंड व अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला – होता. पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कॉन्स्टेबल जाधव, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, शहाजी आंधळे, राहुल गायकवाड, महिला कर्मचारी सुषमा जाधव तसेच तहसीलदार संजय बिरादार, मंडलाधिकारी अनिल गव्हाणे,

गुन्हा

तलाठी श्री. कोकणे हे सदर ठिकाणी पोहचले. त्यावेळी ट्रस्टचे राजश्री सुळे, मदन आव्हाड, फक्कडराव तनपुरे हे उपस्थित होते. सदर ठिकाणी तहसीलदार बिरादार यांनी किरण भीमा शिंदे, शिवाजी भीमा शिंदे, ताराबाई भीमा शिंदे यांना बोलावून कामाबाबत कल्पना देत कामात आडवे येवू नका असे सांगितले. पावणेदोन च्या सुमारास खोल्यांचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असताना किरण शिंदे याने जेसीबी समोर येवून काम बंद पाडले.

पोलीस निरीक्षक जाधव व तहसीलदार बिरादार यांनी त्यास समजवण्याचा प्रयत्न. केला. मात्र आता जीव देतो असे म्हणत त्याने कुणाचे ऐकले नाही. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यास सरकारी जीप मध्ये बसवले असता किरण याने चालक भावर यांच्या सोबत झटापट केली. व सीट बेल्टने स्वतःचा गळा आवळत आत्महत्येचा प्रयत्न करत असताना कॉन्स्टेबल जाधव व ससाणे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ही मुक्कामार लागला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newasa news online
गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा