ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शाळा

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती निवडी संदर्भात १ऑगस्ट २०२४ च्या पालक मेळाव्यात पालक वर्ग,सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीत पुर्नरचनेसाठी विचारविनिमय करण्यात आला होता.त्यास अनुसरण समिती स्थापन परिपत्रकाचे वाचन करण्यात येऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विक्रांत भगीरथ पवार यांची दुसऱ्यांदा निवड एकमुखाने करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सौ रेखा दिलीप माळी यांची निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समिती मध्ये सदस्य म्हणून रवींद्र देठे, सौ संगिता शेळके,सौ निर्मला राक्षे,सौ रुपाली तुवर,शकिल पटेल, महेश पडोळ,सौ भारती तुवर,अमोल फुलसौंदर या सर्वांची सदस्य म्हणून निवड झाली तर शिक्षक तज्ञ म्हणून मा शिक्षक तथा उपसरपंच ज्ञानदेव आढाव यांची निवड करण्यात आली. स्थानिक प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सदस्य अनिता माळी, शिक्षक प्रतिनिधी शरद पवार,विद्यार्थी प्रतिनिधी यश पारखे,आराध्या मतकर यांची निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या सचिव पदी शाळेचे मुख्याध्यापक मनोज पवार यांची निवड झाली. या निवडी झालेल्या सर्व सदस्यांचे शाळेतील सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

शाळा

शाळेच्या नवीन कामासाठी विशेष लक्ष वेधून आपल्या गावातील शाळा कश्याप्रकारे चांगली दर्जेदार होईल याकडे माझ्या बरोबर शाळा व्यवस्थापन समितीने आवर्जून मदत केली. आपल्या गावातील मुलांचे हेळसांड कमी होऊन त्यांना चांगले प्रकारे शिक्षण मिळेल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले.त्यात आम्हाला गावातील पालकांनी,ग्रामस्थांनी व शिक्षकांनी मोलाची साथ दिली.यामुळे मला दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला त्यात राहिलेल्या शाळेच्या खोल्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व शाळा व्यवस्थापन समिती प्रयन्त करणार आहे,तसेच या कामाला आम्हाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून मदत करावी.
– विक्रांत पवार अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, पाचेगाव

शाळा
शाळा
शाळा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शाळा
शाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शाळा