ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

तिरंगा

नेवासा – हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत तहसीलदार यांच्या निर्देशानुसार नेवासा नगरपंचायत मार्फत प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी श्रीमती सोनाली मात्रे व कार्यालय अधीक्षक रामदास म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली होती. यामध्ये ज्ञानोदय हायस्कूलचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगरपंचायत कार्यालयापासून रॅलीस सुरुवात करण्यात आली. डॉ. हेडगेवार चौक, मारुती मंदिर, श्री मोहिनीराज मंदिर, औदुंबर चौक मार्गे नगरपंचायत चौकात रॅली आली असता श्रीमती सोनाली मात्रे व रामदास म्हस्के यांनी ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत सायकल तिरंगा रॅली,

तिरंगा

तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॅनव्हॉस व तिरंगा प्रतिज्ञा, घरोघरी तिरंगा ध्वज लावणे व तिरंगा सेल्फी, तिरंगा मेळा व तिरंगा कॉन्सर्ट राबविणे, १५ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थी, युवक मंडळे, बचत गट महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी तिरंगा ध्वज देऊन यात्रेचे आयोजन करणे, उपस्थितांना हर घर तिरंगा या उपक्रमाबद्दल माहिती देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले. या रॅलीत भाऊसाहेब म्हसे, योगेश सर्जे, राम सरगर, श्रीमती मनीषा मापारी, सागर गाडे, विश्वास वाघमारे, विलास अरले, सुशील चक्रनारायण, योगेश गवळी, परशुराम डवले, प्रताप कडपे, रामदास मतकर आदी सहभागी झाले होते.

newasa news online
तिरंगा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तिरंगा
तिरंगा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तिरंगा