नेवासा –तालुक्यातील सौंदाळा येथे लागवड केलेल्या पपईच्या बागेत ३० टक्के पेक्षा अधिक नर जातीची झाडे निपजल्याने सध्याच्या बाजार भावानुसार २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अहवाल अध्यक्ष तालुका तक्रार निवारण समिती तथा उप विभागीय कृषी अधिकारी – श्रीरामपुर यांनी दिला आहे.
सौंदाळा येथील शेतकरी भारत बाबुराव आरगडे यांनी सौंदाळा येथील गट क्रमांक ८६ मध्ये फेब्रुवारीत पपई लागवड केली. अधिक उत्पन मिळण्याच्या अपेक्षेने जळगाव येथील नामांकित बायोटेक कंपनीकडून एक एकरसाठी १५ नंबर पपई वाणाची रोपे खरेदी केली. आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून जोपासत असलेल्या या बागेत मोठ्या प्रमाणात नर झाडे आल्यावर आरगडे यांनी संबंधित कंपनीस कळविले .
आम्ही रोपांची हमी देत नाही ,असे सांगुन कंपनीने हात वर केले. नंतर आरगडे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते कारभारी गरड यांना माहिती देऊन सहकार्य मागीतले. त्यांनी प्रथम कंपनीशी संपर्क साधुन समन्वयक साधण्याचा प्रयत्न करुन दाद मिळत नसल्याने नंतर कृषी खात्याकडे लेखी तक्रार देण्याचे सुचविले. आरगडे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये १ हजार पपई रोपांची लागवड केली होती.त्यापैकी सध्या ६०० झाडे असुन त्यात २०० नर आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. इतर शेतक-यांना या कंपनी पासुन सावध होण्यासाठी आरगडे तक्रार दाखल करत आहेत.
आरगडे यांच्या तक्रारीची दखल घेत तालुका तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा श्रीरामपूर उप विभागीय कृषी अधिकारी ए.बी.काळे व सहकारी , महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरीचे शास्त्रज्ञ डाॕ. प्रा.ए.व्ही आत्तार , पंचायत समितीचे बियाणे निरिक्षक प्रताप कोपनर व तालुका कृषि अधिकारी धनंजय हिरवे यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेट देऊन पाहणी व पंचनामा केला. पाटिल बायोटेक चे प्रतिनीधी सचिन म्हसे यावेळी उपस्थित होते.
बियाणे नियंत्रण कायदा १९८५ कलम ९ नुसार रोपांचे बिल देणे बंधनकारक असताना, वेळोवेळी मागणी करुनही कंपनीने टाळाटाळ केली . या फसवणुकीच्या विरोधात कारभारी गरड यांचे मार्गदर्शनाखाली आरगडे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागणार आहेत.
कृषी समितीचा अहवाल प्राप्त झाला असुन ३० ते ३५ टक्के नर झाडे असुन त्यांना फलधारणा न झाल्याने आरगडे यांचे अंदाजे १६० क्क्विंटल उत्पन्न कमी येणार आहे. जवळपास २ लाख ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.