नेवासा – नेवासा तालुक्यातील टोका येथील जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने गोपाळकाला उत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी दि.२७ ऑगस्ट रोजी खुल्या कबड्डी व दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक शांतवन खंडागळे यांनी दिली. प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात
मंगळवारी दि.२७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.ही स्पर्धा रात्री ९ वाजेपर्यंत चालेल त्यानंतर टोका येथील खंडोबा मंदिर प्रांगणात रात्री ९ ते १० यावेळेत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल.
या दहीहंडीसाठी पुणे येथील कलारत्न पुरस्कार विजेते अजय कुलकर्णी यांच्या वतीने चषक ठेवण्यात आला आहे. कबड्डी व दहीहंडी स्पर्धेचे बक्षीस वितरण हे खंडोबा मंदिर प्रांगणात होणार असून याच ठिकाणी कबड्डी व दहीहंडी स्पर्धेतील चषक व रोख बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे.या होणाऱ्या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने युवकांनी सहभागी व्हावे त्यासाठी शांतवन खंडागळे यांच्या ९५ ७९ ७३ ८७ ७२ भ्रमणध्वनीवर संपर्क साधून स्पर्धेसाठी नावनोंदणी असे आवाहन टोका येथील जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.