नेवासा – गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा या शाळेसाठी सौंदाळा ग्रामपंचायत कडून विविध भौतिक सुविधा रुपी साहित्य वितरित करण्यात आले.
यामध्ये पंधराव्या वित्त आयोगांमधून शाळेच्या मागणीच्या प्राधान्यानुसार साहित्य देण्यात आले. शाळेसाठी विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून शाळेसाठी बोरवेल तसेच त्यामध्ये मोटर पाईपलाईन सर्व सुविधायुक्त सेट देण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेमध्ये अखंडरीत्या विद्युत पुरवठा सुरू राहावा म्हणून महावितरण कडून लाईट कनेक्शन बंद करून शाळेसाठी ग्रामपंचायत कडून तीन के व्ही चे सोलर सिस्टिम बसवण्यात आली यामध्ये शाळेतील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच शाळेचा बोरवेल इत्यादी सर्व सुविधा एकाच वेळी सुरू असणार आहेत इतक्या क्षमतेची सोलर सिस्टिम बसवण्यात आली.
त्याचप्रमाणे खडू फळाला फाटा देऊन डिजिटल शिक्षणाला सुरुवात म्हणून शाळेमध्ये 75 इंची डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड, ओपीएस,यूपीएस व साउंड सिस्टीम सहित देण्यात आला. इंटर ऍक्टिव्ह बोर्डमुळे विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी खडू फळ्या ऐवजी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत ज्यामध्ये पारंपरिक शिक्षण पद्धतीत मर्यादा येत होत्या. या सर्व सोयी सुविधांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपट घुले सर तसेच शाळेतील शिक्षक कल्याण नेहुल सर राजेश पठारे सर रविंद्र पागिरे सर किशोर विलायते सर कल्पना निघुट मॅडम व संजीवनी मुरकुटे मॅडम उपस्थित होत्या. सोलर सिस्टिम इंटरॅक्टिव बोर्ड व बोरवेल असे एकूण मिळून जवळपास सहा ते सात लाखाचे साहित्य रुपये मदत झाली.
यावेळी सौंदळा ग्रामपंचायतचे सरपंच श्री शरदराव आरगडे उपसरपंच सौ कोमल आरगडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भारत आरगडे उपाध्यक्ष श्री राजेंद्र आरगडे व शाळा प्रशासनाकडून आभार मानण्यात आले.
सरपंच श्री शरदराव आरगडे यांनी असे सांगितले की या पुढील काळात आणखी पाच इंटरॅक्टिव्ह बोर्ड देणार आहोत. शाळेतील गुणवत्ता ही उत्कृष्ट असून या भौतिक सुविधेमुळे आणखी गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.