ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रोडरोमिओ

मुलींची छेड काढणाऱ्यांची गय करणार नाही – पो.उ.नि. संदीप ढाकणे

भेंडा – पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा-महाविद्यालये परिसरात पेट्रोलिंग सुरू असून शाळकरी,महाविद्यालयीन मुलींची छेड काढणाऱ्या टारगटांची व रोडरोमिओंची गय करणार नाही अशी तंबी पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी दिली.

रोडरोमिओ

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शाळा, विद्यालय व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलिंची खेडछाड करणाऱ्या टारगटांचा बंदोबस्त करण्याची मागणी भेंडा ग्रामस्थांनी नेवासाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे कडे केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेत श्री.जाधव यांनी कुकाणा पोलिस दुरक्षेत्राचे प्रभारी उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार उपनिरीक्षक संदीप ढाकणे,पोलीस नाईक बाबा वाघमोडे, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर रसाळ, चालक पोलीस अमलदार संतोष खंडागळे यांच्या पथकाने भेंडा हायस्कूल, महाविद्यालय परिसरात कारवाई करून मुलींची छेड काढणाऱ्या टारगटांची व रोड रोमिओंची धुलाई केली.

तसेच जोरात हॉर्न वाजवून मोटारसायकल जास्त रेस करून, वेगवेगळे प्रकारचे कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवून गाडया पळवणाऱ्याना ही पोलिसी खाक्या दाखविला.शाळा व महाविद्यालय सुरू होण्याच्या वेळी, मधल्या जेवणाच्या सुट्टीत आणि सांयकाळी शाळा सुटण्याच्या वेळी पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केल्याने रोडरोमिओंनी पोलिसांचा धसका घेतला आहे तर पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व त्यांच्या टीमने तक्रारीची तातडीने दखल घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी पोलीस खात्याला धन्यवाद दिले आहेत.

newasa news online
रोडरोमिओ
रोडरोमिओ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रोडरोमिओ
रोडरोमिओ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रोडरोमिओ