ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

धनंजय जाधव

नेवासा – आगामी गणेश उत्सवामध्ये तालुक्यात डिजेवर पूर्णपणे बंदी असून डीजे-डॉल्बीचे कर्णकर्कश आवाज व लेझर लाईट्सवर मनाई असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

अधिक माहिती देताना श्री. जाधव म्हणाले, आगामी गणेश उत्सवामध्ये डीजे डॉल्बीडीजे- डॉल्बी, कर्णकर्कश आवाज व लेझर लाईट्स या आरोग्याला घातक असल्याने तसेच आवाजाबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे –देखील वेळोवेळी – आदेश आहेत. आगामी गणेशोत्सव व ईद-ए- मिलाद सण साजरे करताना मंडळांनी शासकीय परवानगी घेऊन कायद्याचे पालन करावे.

धनंजय जाधव

डीजेवर पूर्ण बंदी असून, लेझर लाईटचा वापर करू नये. ध्वनिक्षेपकासाठी एक बेस व एक टॉपचा वापर करावा. प्रत्येक गणेश मंडळामध्ये दोन स्वयंसेवक मूर्ती संरक्षणासाठी ठेवणे बंधनकारक आहे. वाहतुकीस अडथळा होईल, असे मंडप रस्त्यावर, सार्वजर्निक जागेत उभारू नयेत. पावसामध्ये मूर्ती भिजू नये यासाठी पत्र्याचा मंडप उभारावा. प्रत्येक मंडळामध्ये भेट दिलेल्यांच्या नोंदींसाठी वही ठेवावी.

देखावा सादर करताना कोणताही आक्षेपार्ह मजकूर, चित्रफीत सादर करू नका. समाजात, जाती-जातींमध्ये, धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असे फलक लावू नयेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अवमानकारक मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करू नयेत वा शेअरही करू नयेत. सण साजरा करीत असताना काही अडचण असल्यास, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहनही नेवासे पोलिसांनी सोशल मीडियावर केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत कोणत्याही मंडळाने डीजे-डॉल्बी बुक करणार नाही, नंतर मागावून बुक केलेला आहे, असं ऐकून घेतलं जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

newasa news online
धनंजय जाधव

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

धनंजय जाधव
धनंजय जाधव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

धनंजय जाधव