नेवासा – तालुक्यातील प्रवरासंगम येथे २९ मे २०२४ रोजी झालेल्या घरफोडीत चोरीस गेलेले दागिने तपासात आरोपीकडून जप्त करण्यात आले व न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांना परत करण्यात आले. प्रवरासंगम येथील अजय अंकुश आरडे यांचे बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून २९ मे रोजी रात्री चोरी झाली होती. त्यात रोख एक लाख रुपये तसेच सोन्याचे मिनी गंठण, सोन्याचे दीड तोळ्याचे झुबे, एक तोळ्याचे मिनी गंठण असा मुद्देमाल चोरून नेला होता.
पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या मदतीने ३ जून रोजी किशोर तेजराव वायाळ (मेरा बुद्रुक ता.चिखली जि. बुलढाणा), गोरख रघुनाथ खळेकर (रा. शिरसवाडी ता.जि.जालना) व विष्णू हरिश्चंद्र हिंगे (जालना) यांना पकडले असता त्यांच्या अंगझडतीत गळ्यातील सोन्याचा सर, झुबे, कानातील बहुराणी, सोन्याची अंगठी असा मुद्देमाल मिळून आल्याने तो गुन्हयात जप्त करण्यात आला होता.
३ सप्टेंबर रोजी नेवासा न्यायालयाच्या आदेशाने जप्त करण्यात आलेले सोन्याचे मिनी गंठण व झुबे असे सोन्याचे दागीने फिर्यादी अजय अंकुश आरडे यांना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशाने परत देण्यात आले. अंकुश आरडे यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे व कॉन्स्टेबल अंबादास जाधव यांचे आभार मानले आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.