ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

जनावरे

नेवासा – पो.नि श्री दिनेश आहेर हे गणेश उत्सव निमित्त हद्दपार व बंदोबस्ताची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे कैफ कुरेशी व मोसीन बशिर कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला चांदा तालुका नेवासा हा त्याचे राहते घरात महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असताना ही गोवंशी जातीचे जिवंत जनावरांना अमानुषपणे वागवून देवुन त्यांना विना चारा व पाण्याचे ताब्यात ठेवून त्याची कत्तल करीत आहे तेथे सापळा लावल्यास मिळुन येईल अशी बातमी मिळाल्याने त्यांनी पोसई तुषार धाकराव सो, पोहेकॉ. / 318 विश्वास अर्जुन बेरड, पोहेकॉ./488 बाळासाहेब भागुजी पालवे,

पोहेकॉ. /1372 संतोष शंकर लोढे, पो.हे.कॉ. / 185 ज्ञानेश्वर नामदेव शिंदे, पोना/437 सोमनाथ झांबरे, पोकों/435 बाळु सुभाष खेडकर, पो.कॉ. किशोर आबासाहेब शिरसाठ चालक पो.कॉ. / 841 अरुण भिमराव मोरे
अशा कर्मचाऱ्यांना तत्काळ सदर ठिकाणी कारवाई करणे बाबत तोंडी आदेश दिल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सरकारी वाहन व एक खाजगी वाहनाने निघून बातमीतील नमुद ठिकाणी कुरेशी मोहल्ला चांदा तालुका नेवासा जि. अ.नगर बातमीतील नमुद ठिकाणी ठिक 21/45 वा. सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम गोवंशी जनावराची कत्तल करीत होते.

जनावरे

त्यावेळी त्यातील दोन इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले व एका इसमास आम्ही जागीच पकडुन त्यांना आम्हां पोलीसाची व पंचाची ओळख सांगुन पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नावे 1) आलीम गुलाम गोस शेख वय 38 वर्षे रा. चांदा ता. नेवासा यास जागीच पकडुन त्याला पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांचे नाव 2) मोहमंद कैफ शेख 3) मोसीन बशिर कुरेशी दोघे राहणार चांदा तालुका नेवासा असे असल्याचे सांगीतले सदर कत्तल केलेल्या ठिकाणची व जिवंत जनावरे बांधून ठेवलेल्या ठिकाणीची पाहणी केली असता सदर ठिकाणी उभे असलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीचा पिकअप क्रमांक MH 16 AE 6340 अशी उभी असुन त्यामध्ये खालील वर्णनाच्या व किंमतीच्या गोवंशं जातिचे जनावारे दाटी रेटीत बसवलेले व कापलेले जनावरांचे गोमांस मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे

1) 40,000 /- अंदाजे किमंतीचे 200 किलो वजनाचे कापलेले जनावरे गोमांस किंमत अंदाजे प्रति किलो 200 रु प्रमाणे

2) 15,000/- काळ्या पांढऱ्या रंगाची गाय जर्शी शिंगे नसलेली किं.अ.

2) 25,000 /- रु किं. पाढऱ्या रंगाची खिलारी जातीचा बैल शिंगे असलेला कि.अं.

3) 10,000/- रु किमंतीचे काळ्या पांढऱ्या रंगाची जर्शी कालवड कि.अं4) 10,000/-
रु. किंमतीचे तांबड्या व पांढऱ्या रंगाचे दोन गोन्ड कि.अं..

5) 5,000/-
रु. किंमतीची जर्शी कालवड कि.अं.

6) 5,00,000
रु. किंमतीचा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा कंपनीचा पीकअप क्रमांक MH 16 ΑΕ 6340
जु.वा. कि.अं.

6,05,000/- एकूण किमतीचे गोमास जप्त करण्यात आले.

जनावरे

महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असातंना ही गोवंशी जातीचे जिवंत जनावरे डाबून ठेवून त्यांना अमानूषपणे वागवून त्यांना विना चारा व पाण्याचे ताब्यात ठेवून त्याची कत्तल करतांना मिळून आले त्यांचे विरुध्द भा. न्याय संहिता 2023 कलम 271, 3 (5) महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे कलम 5 (अ) (ब) (क) 9 व प्राण्याना निर्दयतेने वागवण्यांचे कलम 3,11 प्रमाणे फिर्याद दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नेवासा -शेवगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

जनावरे
जनावरे
जनावरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनावरे
जनावरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनावरे
error: Content is protected !!