ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

बदलापूर

पोलीस अधिकार्यांना लागली गोळी;अधिकारी गंभीर

बदलापूर : अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असतांना त्याने पोलिसांकडून बंदूक घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय शिंदेसोबतच पोलिस अधिकाऱ्यालाही गोळी लागली आहे. या पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आधीच्या माहितीनुसार, तळोजा कारागृहातून बदलापूर पोलिस ठाण्याकडे नेत असतांना अक्षयने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आहे. या घटनेत अक्षय शिंदे यालाही गोळी लागली आहे. आरोपीने तीन राऊंड फायर केल्याची माहिती होती.

बदलापूर

बदलापूर पोलिस तळोजा कारागृहात आरोपी शिंदेला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस मुंब्रा बायपासजवळ आले असता शिंदे याने एका हवालदाराकडून शस्त्र हिसकावले आणि एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात, दुसऱ्या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीवर गोळीबार केला आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बदलापूर
बदलापूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बदलापूर
बदलापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बदलापूर