गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दिलेले उसने पैसे मागितले च्या कारणावरून पिता पुत्रास मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार. फिर्यादी दत्तात्रय सुभाष बिडे वय ५८ यांचे जुना वांबोरी रोडवर सलुनचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब चंद्रकांत मतकर यांना हात उसने पैसे दिले होते. ते त्यांनी मतकर यांना मागीतले होते. त्याचा राग आल्याने बाबासाहेब चंद्रकांत मतकर, बंडु चंद्रकांत मतकर, प्रकाश एकनाथ मतकर, संतोष राजेंद्र राशिनकर, रवी सुभाष ठोबळे, ओम आदिनाथ शिंदे, दादा रामदास सुर्यवंशी, दिपक एकनाथ तागड,
सर्व राहणार दत्त नगर जुना वांबोरी रोड यांनी फिर्यादीस व त्यांचे मुलास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे . दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र नं. ३९७/२०२४ बिएनएस चे कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०,११५(२), ३५२,३५१(२),(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.