गणेशवाडी – सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी पदभार स्विकारताच अवघ्या काही दिवसात परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुध्द धडक कारवाई सुरू केली आहे .या मध्ये घोडेगाव येथे अजिज मुसा शेख वय ३८ रा घोडेगाव हा तेथील मारुती मंदिरा जवळ विना परवाना कल्याण मटका खेळताना व लोकांना खेळविताना मिळून आला. त्याचे कडुन ६३० रुपये रोख रक्कम व जुगार हम खेळण्याचे साहित्य जप्त केले. दुसरी कारवाई घोडेगाव येथील झोपडपट्टी मध्ये टपरीमध्ये संभा हनुमंत बऱ्हाटे वय ४२ रा घोडेगाव हा देखील विना परवाना कल्याण मटका खेळताना व लोकांना खेळविताना आढळुन आला.
त्याचे कडुन रोख रक्कम ७३० व मटका खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तिसरी कारवाई ही सोनई येथील दिपक लक्ष्मण भालेराव वय ३५ रा. सोनई राजवाडा हा स्वामी विवेकानंद चौकात एका पत्र्याच्या टपरीमध्ये विना परवाना गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करताना आढळून आला. त्याचे कडुन १५०० रुपये किंमतीची तयार दारू जप्त करण्यात आली. चौथी कारवाई सोनई येथील साहेबराव दाजी सोनवणे वय ६८ रा. दरंदले गल्ली हा माधवबाबा चौकात एका पत्र्याच्या टपरीमध्ये विना परवाना गावठी हातभट्टीची १००० रुपये किंमतीची तयार दारू विक्री करताना आढळून आला. वरील सर्वांविरूध्द सोनई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस करत आहेत. हि. कारवाई यापुढे ही अशाचा प्रकारे सुरू राहणार असल्याचे माळी यांनी सांगितले. त्यांचे या कारवाईने मात्र अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.