नेवासा – नेवासा येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात माहिती अधिकार कायदा जनजागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी ॲड.रमेश पाठे व ॲड.बापूसाहेब गायके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ॲड.रमेश पाठे म्हणाले, “माहिती अधिकार कायदा म्हणजे सरकारी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे. हा कायदा सर्वात महत्वाचा कायदा आहे जो सामान्य नागरिकांना सरकार आणि त्याच्या कार्यप्रणालीबद्दल प्रश्न विचारण्यास सक्षम करतो. लोकप्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनाचे उत्तरदायित्वही वाढलेले आहे.”
ॲड.बापूसाहेब गायके म्हणाले, “माहिती अधिकार कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट नागरिकांना सक्षम बनवणे, सरकारी कामकाजात खुलेपणा आणि उत्तरदायित्वाला चालना देणे, भ्रष्टाचाराशी लढा देणे आणि आपली लोकशाही खऱ्या अर्थाने लोकांसाठी कार्य करणे हे आहे. माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वातंत्र्य होय. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १९ प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला भाषण आणि विचार स्वातंत्र्याचा हक्क आहे. या हक्काचाच भाग म्हणजे माहितीचा अधिकार होय. माहितीचा अधिकार हा व्यक्तीचा नैसर्गिक, मानवी आणि मूलभूत अधिकार आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.राधाताई मोटे या होत्या. पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक यश संवाद विभागाचे प्रा.देविदास साळुंके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.गोवर्धन रोडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.भगवंत वीरकर, प्रा.मंदाकिनी थावरे, प्रा.संगीतानवले, डॉ.कविता जाधव, प्रा.ज्योती भोगे, प्रा.साक्षी रेडे उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.