पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव (कारवाडी) येथील दगडु लक्ष्मण शिंगोटे वय ५० वर्षे धंदा शेती रा. पाचेगाव ता. नेवासा यांनी समक्ष पोलीस स्टेशन मध्ये हजर होवुन लेखी फिर्याद दिली.त्यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले की, मी वरील ठिकाणी राहणारा असुन घरात मी, पत्नी-संगीता, आई-हौसाबाई, मुलगा-अभिषेक व अनिकेत असे एकत्र राहतो व शेती व्यावसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवीतो. माझ्याकडे चार मोठ्या शेळ्या व एक बोकड असुन त्याचा मी स्वतः संभाळ करतो. त्यांना मी माझ्या घरासमोर शेड मध्ये बांधत असतो.
दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ वा. चे सुमारास मी व घरातील सर्व जण जेवण करुन झोपी गेलो होतो. त्यानंतर दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ३ वा, चे सुमारास मला कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने,मी माझ्या राहते घराच्या बाहेर येवुन शेडमध्ये पाहीले असता मला माझ्या शेड मधील एक बोकड दिसला नाही. त्यावेळी मी त्याचा आस- पास शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. त्यावेळी माझी खात्री झाली की माझा सहा महिने वयाचा बोकड कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे.
त्याचे आजच्या बाजार भावनुसार अंदाजे किंमत ४०००(चार हजार रुपये)आहे.तसेच त्याचे वर्णन पांढऱ्या रंगाचा सहा महिने वयाचा बोकड हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेला आहे. म्हणुन माझी अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.,नवीन कायद्याच्या कक्षेत अज्ञात व्यक्तीवर फिर्याद दाखल करण्यात आली. पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.