बेलपिंपळगाव – बेलपिंपळगाव येथे विजयादशमी निमित्त शनी दि 13 ऑक्टोबर 2024 रोजी आ शंकरराव गडाख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा भूमिपूजन तसेच खंडोबा मंदिर सभामंडप, स्वामी समर्थ मंदिर सुशोभीकरण, लक्ष्मी माता मंदिर सभामंडप,संत सावता महाराज मंदिर संरक्षण भिंत, हनुमान विद्यालय ते श्री स्वामी समर्थ मंदिर,रोकडोबा हनुमान मंदिर स्ट्रीट लाईट बसविणे या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न झाले. याप्रसंगी बोलतांना आ शंकरराव गडाख म्हणाले अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्याचे भाग्य लाभले याचा विशेष अभिमान आहे. छत्रपती शिवरायांनी रयतेच्या कल्याणाची भूमिका घेतली. सर्व धर्म समभाव जपत सामाजिक ऐक्य साधून समतेचा संदेश दिला.
बेलपिंपळगाव येथे साकारला जाणारा अश्वारूढ पुतळा प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा क्षण आहे. छत्रपती शिवराय व सर्व महापुरुष यांना स्मरून सर्वसामान्य जनतेचे कामे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आ गडाख यांनी सांगितले पुढील काळात तालुक्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी विशेष प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. बेलपिंपळगाव गाव व गटात अनेक कामे मार्गी लावली असून अनेक कामे निश्चितपणे सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मार्गी लावणार असल्याचे म्हणाले. व शिवरायांचा पुतळा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे आ गडाख म्हणाले व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्फूर्तीदायी आहेत असेही आ गडाख आवर्जुन म्हणाले. व छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आशा सूचना आ गडाख यांनी शिल्पकार दिल्या व पुतळा उभारणी व सुशोभीकरण कामाच्या थ्री डीची पाहणी केली.
याप्रसंगी शिवव्यख्याते इंजि रमेश सरोदे यांनी उपस्थित शिव प्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास समजावून सांगितला. आ शंकरराव गडाख यांनी पुतळा उभारणीच्या कामात सहकार्य केले याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले व आ गडाख यांच्या उपस्थितीत दरवर्षी दसरा मेळावा बेलपिंपळगाव येथे घेण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चंद्रशेखर गटकळ यांनी केले याप्रसंगी राजेंद्र शिंदे,कार्ल्स साठे,नवनाथ पठाडे, बाळासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थितांचे आभार सरपंच सकाहरी शिंदे यांनी मानले. याप्रसंगी ह भ प दत्तात्रय महाराज त-हाळ, ह भ प संजय महाराज सरोदे,जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके,मा सभापती दिगंबर शिंदे,मा सभापती वसंतराव रोटे,सरपंच कृष्णा शिंदे,प स सदस्य रवींद्र शेरकर,अशोकाचे संचालक अमोल कोकणे,मा सरपंच राजेंद्र साठे,पो पाटील संजय साठे,मा सरपंच योगेश म्हस्के,प्रभाकर पटारे,विष्णू आव्हाड,मा सरपंच बाळासाहेब त-हाळ,चेअरमन आप्पासाहेब रोटे,मा उपसरपंच बंडू चौगुले,गंगाधर चौगुले,बाळासाहेब पुंड, कल्याण शिंदे,वसंतराव शेरकर, सुभाष सरोदे,किशोर गारुळे,
दादासाहेब शिंदे,फकिरा कांगुणे,भिमराज साठे,अमीन सय्यद,वसंतराव भद्रे, विष्णुपंत शिरसाठ,नवनाथ कांगुणे,संतोष माळवे,विवेक शिंदे, महेंद्र साठे,अशोक कनगरे,बबन कनगरे,आण्णा वैद्य,रामेश्वर तनपुरे,कैलास झगरे,राजेंद्र कदम,विलास शिंदे,विजय शेरकर,सचिन सोनवणे,गणेश धीर्डे, राम वरघुडे,गणेश कांगुणे,रोहित शिंदे आदींसह बेलपिंपळगाव व परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा भूमिपूजन प्रसंगी तरुणांनी तरुणांनी जय भवानी, जय शिवाजी नावाचा जल्लोष करत आनंद साजरा केला.
अनेक वर्षांपासून बेलपिंपळगाव येथील अश्वारूढ पुतळ्याचे काम मार्गी लागावे ही शिवप्रेमींची इच्छा होती आ शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने बेलपिंपळगाव येथे पुतळा दीड महिन्यात पूर्णत्वास येत आहे याबद्दल शिवप्रेमींनी आ गडाख यांचे विशेष आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.