ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वाईन शॉप

नेवासा – नेवासे फाटा – हंडीनिमगाव शिवारातील अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रोड लगत असलेल्या १८/३ या गट नंबर मध्ये सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर असल्याने त्याविषयी एक वेळ सुनावणी व चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे माजी अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी केली आहे.

अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासे फाटा येथे सध्या वाईन शॉप सुरू आहे हे दुकानाचे गट नंबर १८/३ असून याला दिलेली परवानगी बेकायदेशीर आहे. सदर जागा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अनुसार वाणिज्य प्रयोजनाकरिता बांधकाम परवानगी देण्यास योग्य नाही. असा आरोप राजेंद्र वाघमारे यांनी केला आहे.

सदर जागा मोहिनीराज त्रिंबक देशपांडे यांना जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट) नियम च्या तरतुदीनुसार व अटी व शर्तीच्या आधारे बहाल केली होती. त्यात मुख्य म्हणजे अट बहाल केलेली जागा ही क्रीडांगणे, व्यायाम शाळा व इतर मनोरंजनाच्या प्रयोजनासाठी देण्यात आली होती. पण त्याचे तसे वापर न करता सदर जागा वाणिज्य प्रयोजनाकरिता वापरत आणली आहे.

सदर जागेत ग्रामपंचायत हंडीनिमगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्याद्वारे नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता कुठलेही ग्रामसभा न भरवता सदर जागेत वाईन शॉप करिता ग्रामसभेचा ना-हरकत ठराव देण्यात आल्याचा देखील आरोप राजेंद्र वाघमारे यांनी केला आहे.

वाईन शॉप

वरील परिस्थिती पाहता, उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांच्या‌द्वारे सदर जागेवर देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात यावी तसेच सदर प्रकरणात आम्हास सुनावणीची संधी देण्यात यावी व कागदपत्रे दस्तावेज पुरवण्याची संधी देण्यात यावी व सदर प्रकरणात समस्त पुराव्यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.


बिनशेती आदेशात सदर जागेचा वापर वाणिज्य प्रयोजनाकरिता फक्त “रोड साईड रेस्टॉरंट” या उ‌द्देशासाठी देण्यात आले होते. त्याची दखल न घेता, उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांनी सदर जागेवर “कमर्शियल शॉप” करिता परवानगी दिली.

newasa news online
वाईन शॉप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाईन शॉप
वाईन शॉप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाईन शॉप