ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव हद्दीत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गावाच्या प्रमुख बाजारपेठ ठिकाणी निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने केंद्रीय राखीव पोलीस दल व जिल्हा पोलीस असा संयुक्त रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च करिता नेवासा पोलीस उपनिरीक्षक एक, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे एक पोलीस निरीक्षक व ३५ जवान सहभागी झाले होते. सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा ठरला.

पोलीस

पाचेगाव येथे बाजारतळावर केंद्रीय राखीव पोलीस दलाची बस येताच रूट मार्च पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुटमार्च घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यात नेवासा पोलीस उपनिरीक्षक मनोज आहेर व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यात सहभागी होते.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस