नेवासा फाटा – सध्या नेवाशातील विधानसभेची जोरदार रणधुमाळी चालू असताना नेवाशातील जनतेला मात्र सगळीकडे काही अलबेल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कोण कार्यकर्ता कोणाचा? आणि कोणाचं काम करतोय? हे मात्र सगळं गुलदस्त्यात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ११ तारखेला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यासाठी मोठ्या संख्येने पार पडलेली मुख्यमंत्र्यांची सभा आणि त्यानंतर सध्याचे आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रचारासाठी होणारी उद्धव ठाकरे यांची आजची सभा याकडे नेवाशातील सर्व मतदारांचे लक्ष वेधले आहे.
सध्या जरी उ.बा.ठा.चे उमेदवार शंकरराव गडाख(मशाल) यांच्या बाजूने निवडणुकांचा जनमत कौल अंदाज असला तरी प्रहारचे बाळासाहेब मुरकुटे(बॅट)आणि शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे(धनुष्यबाण)यांचे कार्यकर्ते कोणाचं काम करणार? यावर मशाल, बॅट ,किंवा धनुष्यबाण यांचं सगळं चित्र स्पष्ट होणार आहे..
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.