Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने दणका दिला आहे. मुसळधार पावसाच्या दणक्याने राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे आणि यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेच कारण आहे की, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जिथे रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तेथे मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. तसेच ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे, अतिवृष्टी सारखा पाऊस सुरू आहे तेथील शेतकऱ्यांची पावसाने थोडा काळ विश्रांती घ्यावी अशी इच्छा आहे.
अशातच आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रातील अनेक भागांमधून पावसाचा जोर कमी होणार असे म्हटले आहे. पण राज्यात काही भागात रिमझिम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी चांगला जोरदार पाऊस सुरूच राहणार असे स्पष्ट केले आहे.
तसेच, सध्याचा पाऊस हा शेतीसाठी उपयोगाचा राहणार आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीस मदत मिळणार आहे. आज मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचे प्रमाण कमी राहणार असून येथे दोन ते चार तासांसाठी सूर्यदर्शन होणार असा अंदाज आहे. तसेच आजपासून पुढचे 14 दिवस कोकणात सुर्यदर्शन होण्याची शक्यता खूपचं कमी आहे.
कोकणातील काही मोजक्याचं तालुक्यांमध्ये पाऊस राहणार आहे, पण येथे आगामी काही दिवस सूर्य पाहायला मिळणार नाही, असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. दुसरीकडे विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आज अर्थातच 25 जुलै आणि उद्या 26 जुलै रोजी सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे.
विदर्भात दोन ते तीन तासांसाठी सूर्यदर्शन होणार आहे. यामुळे आज आणि उद्या विदर्भातील शेतकऱ्यांनी फवारणीचे नियोजन करावे असा सल्ला पंजाब रावांनी दिला आहे.
मात्र फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण की विदर्भात दुपारनंतर पावसाची शक्यता कायम आहे. यामुळे पाऊस पडण्याच्या आधीच फवारणी करून घ्यावी जेणेकरून फवारणीचा फायदा होईल.
तसेच पंजाबरावांनी आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 27 जुलै पर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र विभागातील अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, पंढरपूर या भागात एक दोन तासासाठी सूर्यदर्शन होणार असे म्हटले आहे.
म्हणजे येथे या काळात पावसाची विश्रांती राहणार आहे. मात्र या भागांमध्ये देखील विदर्भाप्रमाणेच दुपारनंतर पावसाची शक्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा येथेही पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्याच्या अखेरीसही या संबंधित भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.