ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

भाऊसाहेब

नेवासा – गोदावरी काठावर वसलेल्या जायकवाडी धरणग्रस्त गावामध्ये शिर्डी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दौरा करून प्रचारात आघाडी घेतली प्रवरा संगम परिसरातील विविध १७ गावामध्ये त्यांना जनतेने उत्तम प्रतिसाद दिला खेडले काजळी गावामध्ये त्यांची अक्षरशः मिरवणूक काढण्यात आली व त्यांच्या उमेदवारीचे भव्य स्वागत करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर अशोकराव ढगे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.

निवडणुक ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आपण लोकशाही चे संवर्धन केले पाहिजे तसेच आज शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत त्यांच्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा मसुदा आपण तयार करण्याचे काम करत आहोत त्यामुळे पुढील पंचवार्षिक योजनेत शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे अशी मागणी डॉक्टर ढगे यांनी केली त्या मागणीचा धागा पकडून माजी खासदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शेतकऱ्यांसाठी संरक्षण कायदा आला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू या विषयाला माझा पाठिंबा आहे त्यासाठी मला दिल्लीला पाठवा असे आवाहन केले
या कॉर्नर सभेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नंदकुमार पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके बाजार समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब नवथर आम आदमी पार्टीचे राजू आघाव व्यासपीठावर उपस्थित होते.

भाऊसाहेब

खेडले काजळीचे सरपंच बाळासाहेब येडू कोरडे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले आरपीआयचे नेते साईनाथ शिरसाठ व ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब चव्हाण यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून वाकचौरे यांच्या उमेदवारीला गावच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ ढगे संतोष कोरडे परसराम कोरडे नंदकुमार कोरडे मोहन कोरडे सुदामराव कोरडे संदीपराव ढगे दिनकर उदे मुठ्ठे बाबासाहेब शिरसाट व स्वीय सहाय्यक सोनवणे सादिक शिलेदार तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रामकृष्ण उर्फ बंडूशेठ कोरडे यांनी सर्वांचे आभार मानले.

भाऊसाहेब
भाऊसाहेब

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भाऊसाहेब
भाऊसाहेब

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भाऊसाहेब