ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दूध

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील मुळा थडीच्या पट्ट्यात असलेल्या भागात भेसळयुक्त दूध प्लास्टिकच्या बंद पिशव्यातून कित्येक दिवसांपासून राजरोस पणे विकले जात आहे. भेसळ युक्त दूध तयार करून बंद प्लास्टिकच्या पिशव्यात पॅकिंग करून परिसरातील भागात गावातील किराणा मालाच्या दुकानात विकले जाते . काही कार्यकर्त्यांना याची भनक मिळाल्यानंतर या सामाजिक कार्यकर्तेयानी अन्नभेसळ प्रशासनातील एका अधिकाऱ्याला याची कल्पना देवुन सुध्दा कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. किती तरी दिवसांपासून हा प्रकार राज रोस पणे सुरू आहे .

या आधी किती भेसळयुक्त दूधाची विक्री झाली व याला कोणाचा आशीर्वाद आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे . सदरचा प्रश्न सर्वसामान्यांच्या आरोग्याशी निगडित असल्याने याचा या भागातील लोकांच्या आरोग्यावर काही परिणाम झाला तर या सर्व गोष्टीस कोण जबाबदार? याची चौकशी होणे आवश्यक आहे. अन्न व भेसळ प्रशासनाला माहीती मिळवून सुद्धा कारवाई करण्यामागे टाळाटाळ करणे यामागे काहीतरी वेगळीच शंका उपस्थित केली जाते आहे .

दूध

प्रशासनातील अधिकाऱ्यांचा याला छुपा पाठिंबा असल्याचे दिसते प्लास्टिकच्या पिशवीवर कोणत्याही दूध संघाचे नाव नाही अगर कुठलेही ट्रेडमार्क नाही संपूर्ण पांढरी पिशवी असून त्यावर कोणतेही लेबल नाही ग्रामीण भागातील जनता एवढी सुशिक्षित नसल्याने याचा फायदा संबंधितांकडून घेतला जात आहे. यामागील सूत्रधार कोण याचा उलगडा होणे आवश्यक आहे. आज गंगथडी भागात हा प्रकार सुरू आहे.याचे लोन इतरही भागात पसरू शकतात याला अन्न भेसळ प्रशासनाने वेळीच आवर घालून याचे लोन इतरही ठिकाणी पोहोचू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे..

दूध
दूध

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दूध
दूध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दूध