ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

राजकारण बरोबर सामाजिक उपक्रम राबविण्यात आ. गडाख यांचा कायमस्वरूपी कल – उदयन गडाख

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे काल बुधवार रोजी एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव (घोटी), यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय व हॉस्पिटल, अ.नगर, येथील तज्ञा डॉक्टर टीम यांच्या उपस्थित परिसरातील ४७७ नागरिकांनी विविध रोगांवर मोफत तपासणी करून घेतली.काही नागरिकांना पुढील उपचार करण्यासाठी वरील दवाखान्यात रुग्णांवर मोफत व काही अल्पदरात उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.आमदार शंकरराव गडाख यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने पाचेगाव ग्रामपंचायत , प्रेरणा वैद्यकीय सेवाभावी संस्था यांचे संयुक्त विद्यमाने या शिबाराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराचा शुभारंभ उदयन गडाख व इमामपूर आश्रमाचे मठाधिपती बाळकृष्ण महाराज यांचे हस्ते करण्यात आले.

या शिबिरात ४७७ नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ६९ नागरिकांची यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय व हॉस्पिटल, अ.नगर,यांच्या मार्फत करण्यात आले.४०८ नागरिकांची इतर विविध रोगावर तपासण्या करण्यात आले.या शिबिरात व) शुगर ,रक्तदाब, ब्लड, ऑक्सिजन, तपासणी ईसीजी सल्ल्यानुसार तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना तपासून सल्ला देण्यात आला. या शिबिरात उपचारांवर तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व मागर्दर्शन (हृदयरोग),मोफत इसीजी,
छातीत दुखणे, चालताना दम लागणे, दरदरून घाम येणे, छातीवर भार वाटणे, डाव्या बाजूच्या जबड्याला वेदना होणे, डाव्या हाताला मुंग्या / वेदना तर (नेत्ररोग) तिरळेपणा, मोतीबिंदू, रात आंधळेपणा, दृष्टी कमी होणे,

एकाच डोळ्यात दुहेरी दृष्टी (अस्थिरोग)गुडघे दुखी, खांदे दुखी, खांदा वारंवार निसटणे, दुर्बिणीद्वारे गुडघ्यांचे आणि खांद्यांचे सर्व स्नायूंवरील शस्त्रक्रिया(सर्जरी)हर्निया, हायड्रोसिल, आतड्यांच्या शस्त्रक्रिया, स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, मूळव्याध, पित्ताशयातील खडे, भगंदर(बालरोग)जन्मजात शारीरिक व्यंग, दुभंगलेले टाळू व ओठ, लघवीच्या जागेवरील शस्त्रक्रिया या शिबिरात विविध प्रकारच्या रोगांवर तपासणी करण्यात आली.

आ शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्ताने कायमस्वरूपी तालुक्यात मोठे शिबीराचे आयोजन करण्यात येत.त्यात गरजू रुग्णांवर उपचार करून त्यांना मोठाआधार देण्याचे काम आ गडाख यांनी केले.या माध्यमातून राजकरण करत असताना सामाजिक बांधिलकी गडाख यांनी निश्चितच जपली आहे,असे उदयन गडाख यांनी व्यक्त केले.या प्रसंगी मा सरपंच दिगंबर नांदे,अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे,सरपंच वामनराव तुवर,दत्तात्रय पाटील,पंचायत समितीचे सदस्य विक्रम चौधरी,पुनतगाव येथील सरपंच सुदर्शन वाकचौरे,पाचेगाव येथील डॉ वाल्मिक तुवर,डॉ संजय तुवर ,डॉ खोसे,डॉ केतन जाधव,अविनाश जाधव,निवृत्ती जाधव,अनिल गायकवाड व सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

गडाख
गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख