ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

योगदिन

नेवासा – तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील श्री विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय योगदिन साजरा करण्यात आला. सकाळी ७.१५ वाजता योग साधना व योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी करून दाखविली. योग अध्यापक श्री. शेंडगे व सर्वांनी योग व प्राणायामची प्रात्यक्षिके केली. यावेळी मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.

त्यामुळे निसर्गाशी जीवनशैली बदलून आणि चेतना निर्माण करून आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतो. योग दिनानिमित्त भ्रामरी, अनुलोम मिलोम, कपालभाती, ताडासन, वृक्षासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन आदी योगासने करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी, शिक्षक ज्ञानदेव बारामते यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, पालक उपस्थित होते.

योगदिन
newasa news online
योगदिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

योगदिन
योगदिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

योगदिन