नेवासा – राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून घोडेगाव (ता. नगर) येथे विनापरवाना दारू वाहतूक करणारा कंटेनर पकडला. या कारवाईत ५० लाखांच्या बिअर बाटल्या व कंटेनर असा ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्ककडून अवैध दारूनिर्मिती, वाहतूक व विक्रीवर कारवाई केली जात आहे. घोडेगाव शिवारातून एका कंटेनरमध्ये दारूची वाहतूक सुरू असल्याची खबर उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांना मिळाली होती. त्यांनी केलेल्या सुचनांवरून पथकाने घोडेगाव शिवारात सापळा लावून संबंधित कंटेनर अडवला.
यावेळी वाहनांची तपासणी केली असता त्यात बिअरचे बॉक्स आढळले. तसेच वाहन चालकाने वाहतूक पास व इतर मूळ कागदपत्रे सादर केली नाहीत, त्याकडून प्राप्त वाहतूक ‘पासाच्या दुय्यम प्रतीवरून असे दिसून आले की, वाहतूक पासावर नमुद भागाव्यतिरिक्त दुसऱ्या मार्गाने वाहतूक केली जात आहे, तसेच वाहतूक पासावरील नमूद वाहन चालक महादेव ढाकणे, यांऐवजी विनापरवानगी दुसरा इसम उध्दव आव्हाड हा वाहन चालवित असल्याचे दिसून आले. याबाबत ट्रान्सपोर्टर कृष्णा काथार यांचा बेजबाबदारपणा दिसून आल्याने संशयित आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत कंटेनर क्रमांक एमएच ४६ ओआर ( ६७५१) व बिअरचे बॉक्स असा एकूण ७२ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.