ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गडाख

नेवासा – मुळा साखर कारखान्याच्या विश्रामगृह परिसरात माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मतदारांचे आभार प्रदर्शन मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली की मी गेल्या सहा महिन्यापासून पिक विमा अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत प्रश्न विचारत असताना त्याकडे दुर्लक्ष केले मात्र निवडणुका ध्यानात ठेवून लाडकी बहीण योजनेचे आमिष मतदारांना दाखवून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आणि निवडणुकांमध्ये सरकारी तिजोरीतून आणलेले कोट्यावधी रुपयांचे वाटप मतदारसंघांमध्ये केले. मात्र तरीही लढाईमध्ये हरजीत होतच असते त्यामुळे खचून न जाता अधिक उमेदीने कामाला लागा आणि असेच एकजूट रहा असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.गद्दारीचा कलंक नको म्हणून सोयीचे राजकारण न करता एकनिष्ठ राहिलो म्हणून काहींना माझ्या पराभवाचा असुरी आनंद जरी होत असला तरी तालुक्याचा विकास कोण करू शकतो हे सर्व जनतेला माहिती आहे असे ते म्हणाले.यावेळी नानासाहेब तुवर,कारभारी जावळे, नंदकुमार पाटील ,अशोक गायकवाड, भाऊसाहेब निमसे, अतूल आदमने यांसह सर्वच दिग्गज कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

गडाख
गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख
error: Content is protected !!