नेवासा – समर्पण फाऊंडेशन नेवासा व श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळ्या निमित्त दिपोत्सव व भजनसंध्या कार्यक्रम गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ९ या कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळयाच्या निमित्ताने सायंकाळी ५.३० ते ६ यावेळेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त महंत हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत ७२८ पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव करण्यात येणार असून त्यानंतर पुणे येथील प्रसिद्ध गायिका ह.भ.प.सौ. पुनमताई नळकांडे पाटील यांचा भजन संध्या हा भक्ती गीतांचा कार्यक्रम व मुथ्था मेडिकलचे प्रमुख दिलीपराव मुथ्था यांच्यासह श्रीमती रंजना भाऊसाहेब जगताप यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
दीपोत्सव व भजन संध्याच्या कार्यक्रमानंतर आरती होऊन रात्री ९ ते १० यावेळेत नेवासा येथील डॉ.भाऊसाहेब एकनाथ घुले यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी भाविकांनी दीपोत्सव व भजन संध्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थान व समर्पण फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.