नेवासा तालुक्यातील खाजगी कापुस विक्री केंद्रावर क्विंटल मागे १ किलो घेतला जाणारा कटता घेतला जाणार नाही तसेच हमाली ५० ऐवजी फक्त ३५ रुपये घेतली जाणार असे नेवासा तालुका सरपंच संघटना अध्यक्ष सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले
कुकाणा येथील खाजगी कापुस विक्री केंद्रावर क्विंटल मागे १ किलो कटता व हमाली ५० रुपये घेतली जात होती याबाबत आरगडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा यांचेकडे तक्रार केली होती
तक्रारी नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री नंदकुमार पाटील व उपसभापती श्री नानासाहेब नवथर आणि सचिव श्री देवदत्त पालवे यांनी कुकाणा गावातील सर्व व्यापारी व सरपंच शरदराव आरगडे यांची एकत्रित बैठक घेतली
बैठकीत यापुढे कापसाला कटता घ्यायचा नाही व हमाली देखील ५० ऐवजी ३५ रुपये घेण्याचे ठरले त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांचा क्विंटल मागे १०० रुपये जास्त मिळणार आहेत
याझालेल्या निर्णया संदर्भात नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आरगडें चे आभार मानले आहेत.या वेळी बैठकीस सचिन आरगडे,गणेश आरगडे,भाऊसाहेब आरगडे,भिवसेन गरड,दौलत देशमुख,सोमनाथ नवथर,संतोष सोनवणे,अभिजीत वाबळे,गणेश देशमुख,विजय नाबदे आदी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.