ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दारू

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथील एका दारू अड्यावर सोनई पोलीसांनी छापेमारी करत हजारो रुपयांचे रसायन नष्ट केले. याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार लोहारवाडी ते चांदा रोडवर म्हसोबा मंदिराजवळ एका ओढ्यात अश्पाक बाबा शेख रा. चांदा हा विना परवाना बेकायदा गावठी दारू व तयार करण्यासाठी लागणारे रसायन विक्री करताना व जवळ बाळगताना आढळुन आला. त्याचेकडुन ११,००० रुपये किंमतीच २२० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन, २००० रुपये किंमतीची २० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण १३,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो. काॅ. ज्ञानेश्वर आघाव यांचे फिर्यादी वरुन ४७२/२०२४ महा दा. कलम .६५(फ) ( ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. ए. एच. तमनर हे करत आहेत.

दारू
दारू
दारू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दारू
दारू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दारू
error: Content is protected !!